Saturday, May 2, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

वढा यात्रा : श्रद्धेचा उत्सव, सुव्यवस्थेसाठी प्रशासन सज्ज

चंद्रपूर : कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने येत्या ५ नोव्हेंबर रोजी विदर्भातील पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वढा येथे भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज नियोजन आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध महत्त्वपूर्ण सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

आमदार किशोर जोर्गेवार यांनी सांगितले की, वढा ही भाविकांची आस्था असलेली पवित्र भूमी असून, दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे प्रत्येक विभागाने परस्पर सहकार्याने काम करून यात्रा शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडावी, यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी निर्देश दिले.

बैठकीत वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, वैद्यकीय सेवा आणि पिण्याचे पाणी यासंबंधी सविस्तर चर्चा झाली. यात्रेकरूंच्या सोयीसाठी दहा छोट्या बसेसची व्यवस्था करण्याचे ठरविण्यात आले. तसेच मुख्य आणि पर्यायी मार्गांची डागडुजी, अतिरिक्त पोलिस बंदोबस्त, सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, मदत केंद्र, आणि पावसाच्या शक्यतेसाठी पर्यायी व्यवस्था ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

किशोर जोर्गेवार म्हणाले, “वढा यात्रा ही श्रद्धेचा उत्सव आहे, आणि सुव्यवस्था राखणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. सर्व विभागांनी जबाबदारीने काम केल्यास ही यात्रा अधिक यशस्वी ठरेल.”

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News