Sunday, April 19, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चंद्रपूरमध्ये रोजगार मेळावा – 22 जुलै रोजी एक हजारहून अधिक पदांसाठी भरतीची सुवर्णसंधी

चंद्रपूर : जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा 22 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात घेण्यात येणार आहे.

या रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर आणि सरदार पटेल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

मेळाव्यातून एक हजारहून अधिक पदांची भरती केली जाणार असून, दहावी, बारावी, आय.टी.आय, डिप्लोमा आणि पदवीधर यांच्यासाठी विविध क्षेत्रांतील संधी उपलब्ध आहेत.

सहभाग घेणाऱ्या प्रमुख कंपन्या:

ओमॅट वेस्ट प्रा. लि., एशियन सोलर प्रा. लि., महाराष्ट्र कार्बन प्रा. लि., गोपानी आयर्न अँड पॉवर इंडिया प्रा. लि., भावना एनर्जी, डेक्सॉन इंजिनिअरिंग (नागपूर), सनफायर सिल्ड, ताज बेव्हरेज, वैभव इंटरप्रायझेस (नागपूर), विदर्भ क्लिक 1 सोल्युशन, जे. पी. असोसिएट अँड लॅबोरेटरीज, बोर्डवाला कोचिंग इन्स्टिट्यूट, डी.एन.ए. नीट अकॅडमी, संसुर सृष्टी इंडिया, भारत पे, एस.बी.आय. लाईफ, एल.आय.सी. ऑफ इंडिया इत्यादी नामांकित कंपन्या थेट भरती प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

उमेदवारांसाठी आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड, शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे (किमान 3 प्रती), पासपोर्ट साइज फोटो.

अर्ज प्रक्रिया:
उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर आधी नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर लॉगिन करून ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय जॉब फेअर’ या पर्यायावर क्लिक करून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावा.

इच्छुक नियोक्ते/कंपन्यांनी देखील याच पोर्टलवर आपली रिक्त पदे अधिसूचित करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.

अधिक माहितीसाठी संपर्क:
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर
दूरध्वनी क्रमांक: 07172–252295

जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त अ. ला. तडवी यांनी केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News