Friday, May 15, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

पुण्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे आदेश

पुणे : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट निर्देश पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

पोलीस आयुक्तालयात झालेल्या शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले, संदेश चव्हाण, राहुल जाधव, सुरेंद्र निकम, तसेच विविध शासकीय व शैक्षणिक अधिकारी उपस्थित होते.

श्री. कुमार यांनी सांगितले की, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आणणाऱ्या-निवणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करावेत. सहा वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. चालक, कंडक्टर आणि क्लीनर यांची पोलीस व वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक आहे. शालेय परिवहन समितीने चालकांचे नैतिक व व्यावसायिक पात्रतेची खातरजमा करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

परिवहन विभागाने जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत १,३२१ स्कूल बसेस आणि ६५० इतर वाहनांची तपासणी केली असून त्यामध्ये ४१४ स्कूल बसेस व २०८ इतर वाहने नियमभंग करताना आढळली. या कारवाईत एकूण ५५ कोटी २३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली.

शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी विशेष तपासणी मोहिमा राबवण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही ठोस आश्वासन श्री. कुमार यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा, परिवहन विभाग आणि पोलीस विभाग यांच्यात समन्वय असणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News