चंद्रपूर – महाराष्ट्र दिनानिमित्त चंद्रपूर येथे भव्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. त्यांनी ध्वजारोहण करून वंदन केले व उपस्थितांना महाराष्ट्र राज्याच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करून दिले.
कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध मान्यवर, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालकमंत्री डॉ. उईके यांनी आपल्या भाषणात नागरिकांशी संवाद साधताना राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.
या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रभक्तीचे वातावरण अनुभवायला मिळाले. महाराष्ट्राच्या स्थापनेचा गौरव साजरा करताना जनतेमध्ये अभिमान व उत्साहाची लाट पसरलेली दिसून आली.