चंद्रपूर: जिल्ह्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! एसटी महामंडळाच्या नव्या बसेसचा शुभारंभ आज श्री माता महाकाली मंदिर, चंद्रपूर येथे विधीवत पूजनाने करण्यात आला. या उद्घाटनानंतर महाकाली मंदिर ते अंचलेश्वर बस स्थानक या मार्गावर पहिला प्रवास करून नव्या सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यात आला.
या नव्या बसेसच्या आगमनामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे. या बसेसमध्ये मोबाईल चार्जिंग पॉइंट, आरामदायी आसन व्यवस्था आणि अन्य आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणामुळे जिल्ह्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रवाशांसाठी हाच एक सकारात्मक बदल असून, भविष्यात आणखी सुधारित सेवांची अपेक्षा व्यक्त होत आहे.