Monday, February 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव नागपुरात उत्साहात साजरा – शोभायात्रेला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर : “अहिंसा परमो धर्म” आणि “जगा आणि जगू द्या” अशी महान शिकवण देणारे भगवान महावीर स्वामी यांचा जन्मकल्याणक महोत्सव नागपूरात अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

या पावन दिनानिमित्त, श्री दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट इतवारी नागपूर आणि सकल जैन समाज नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दिगंबर जैन पर्व मंदिर, इतवारी येथून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत विविध झांज, बँड पथकं, पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले भक्त, महिला आणि बालकांनी सहभाग घेतला होता.

शोभायात्रा मार्गात अनेक ठिकाणी भक्तांनी पुष्पवृष्टी आणि स्वागत करून यात्रेचं जोरदार स्वागत केलं. धर्मप्रवचन, भजन, धार्मिक नृत्ये आणि महावीर स्वामींच्या जीवनावर आधारित सादरीकरणांनी वातावरण आध्यात्मिकतेने भारून गेलं.

यावेळी शहरातील अनेक मान्यवर, समाजसेवक आणि जैन समाजातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होते. महावीर स्वामींच्या अहिंसेचा आणि सत्याचा संदेश या उत्सवाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आला.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News