Friday, May 1, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

राजधानीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

नवी दिल्ली : थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि क्रांतिकारी विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आज राजधानी दिल्लीत उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र सदनात अभिवादन समारंभ

कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदन परिसरातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी पुतळ्यास पुष्प अर्पण करून महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन केले. यानंतर कॉपर्निकस मार्गावरील सभागृहातही कार्यक्रम घेण्यात आला. सदनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.

महाराष्ट्र परिचय केंद्रातही जयंतीचे आयोजन

महाराष्ट्र परिचय केंद्रातही महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी देखील प्रतिमेस पुष्प अर्पण करत त्यांच्या कार्यास स्मरण करत कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमांमधून महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करण्यात आला आणि त्यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेतली गेली.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News