नागपूर : भंडारा रोड येथील बिडगाव नाका क्रमांक पाचजवळ असलेल्या गुलशन ट्रेडर्स आणि प्रिन्स इंडस्ट्रीज या दोन गोदामांना काल रात्री अचानक भीषण आग लागली. या आगीत गोदामातील प्लास्टिक पिशव्या आणि इतर साहित्य जळून खाक झाले.
आग लागल्याची माहिती मिळताच कळमना, लकडगंज, सक्करदरा, मिहान-एमआयडीसी, आणि हिंगणा येथील अग्निशमन दलाच्या पाचहून अधिक गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी शॉर्टसर्किटची शक्यता वर्तवली जात आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. तपास अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहितीची प्रतिक्षा सुरू आहे.