Thursday, May 22, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

भंडारा जिल्ह्याच्या खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवरील चमकदार कामगिरी

भंडारा: सुखना लेक, चंदीगड येथे 11 ते 17 मार्च 2025 दरम्यान आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कॅनोइंग, कायाकिंग आणि ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धेत भंडारा जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत RTMNU नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले.

महिला संघाने आपल्या कौशल्याने आणि मेहनतीने ड्रॅगन बोट प्रकारात दोन रजत आणि एक कांस्य पदक, तसेच K2 500 मीटर प्रकारात एक कांस्य पदक पटकावत भंडारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. विशेष म्हणजे ड्रॅगन बोट महिला संघाने सर्वसाधारण उपविजेतेपद मिळवत आणखी एक मानाचा तुरा रोवला.

या उल्लेखनीय यशस्वी कामगिरीबद्दल भंडारा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी खेळाडूंच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक करण्यात आले. जिल्ह्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवत भविष्यातही असेच यश मिळवावे, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.

भंडारा जिल्ह्यातील युवा खेळाडूंच्या या यशाने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, क्रीडा क्षेत्रात भंडाराच्या नावाला नवा सन्मान मिळाला आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News