Saturday, May 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

गडचिरोली पोलिस दलाच्या ‘प्रोजेक्ट शक्ती’ उपक्रमांतर्गत दिव्यांग नागरिकांसाठी कृत्रिम अवयव वाटप शिबिर सुरू

 

डचिरोली : गडचिरोली पोलिस दलाच्या ‘प्रोजेक्ट शक्ती’ उपक्रमांतर्गत दिव्यांग नागरिकांना कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा शुभारंभ पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वात गडचिरोली येथील पोलिस मुख्यालयाच्या सभागृहात करण्यात आला.

 

शिबिराच्या पहिल्या दिवशीच २५० दिव्यांग नागरिकांनी नाव नोंदणी केली असून, त्यांना जयपूर फूट आणि कृत्रिम हात प्रदान करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, २०१५ मध्ये आत्मसमर्पण केलेल्या विनू पोदाळी या माजी नक्षल्याची मुलगी सपना पोदाळी हिला कृत्रिम पाय प्रदान करण्यात आला आहे, ही बाब या उपक्रमाचा एक प्रेरणादायी भाग ठरली आहे.

 

हे शिबिर ११ मार्चपर्यंत सुरू राहणार असून, यासाठी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट २०३०, रोटरी क्लब ऑफ नागपूर नॉर्थ, महावीर सेवा सदन आणि इंडिया ह्युमॅनिओ फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

 

गडचिरोली पोलिस दलाच्या या सामाजिक उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना चालण्याचा नवा आत्मविश्वास मिळणार

आहे.

 

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News