गडचांदूर (चंद्रपूर) : येथे कोरपना तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ. सिंग यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांना आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाला विजयराव बावणे (संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर), उत्तमराव पेचे (अध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी कोरपना), संभाजी कोवे (माजी उपसभापती, प. स. कोरपना), भाऊराव चव्हाण (माजी संचालक, कृ. उ. बा. स. कोरपना), अशोक बावणे (सभापती, कृ. उ. बा. स. कोरपना), गणेश गोडे (संचालक, कृ. उ. बा. स.), निसार भाई (सभापती, नगर पंचायत), सतीश गोंलावार (उपसरपंच), शालिक दूर्लावार (माजी सदस्य), अनिल गोंडे (माजी उपसरपंच) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्वांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या योगदानाचा उल्लेख करून त्यांच्या देशसेवेचे कौतुक केले आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.




