Wednesday, July 15, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदानासाठी सुट्टी

यवतमाळ : राज्यात विधानसभेसाठी दि.20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी या दिवशी सुट्टी घोषित करण्यात आली आहे. राज्यातील सर्व कामगारांना मतदान करता यावे, यासाठी त्यांना देखील सुट्टी राहणार आहे.

निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणताही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मतदानाच्या दिवशी सुट्टी राहील. सदर सुट्टी सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना देखील लागू राहील. शासन परिपत्रकानुसार विधानसभा मतदार संघातील सर्व कामगार, कर्मचारी मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्याकरीता भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे नमुद आहे.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देणे आवश्यक आहे. मात्र त्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

उद्योग विभागांतर्गत येणारी सर्व महामंडळे, उद्योग समुह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादिंच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य पालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरीता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल, असे सरकारी कामगार अधिकारी यांनी कळविले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News