मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अधिकारी संजय यादव यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील कुलाबा, मलबार हिल, मुबांदेवी, वरळी, शिवडी, भायखळा या मतदारसंघातील मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट दिली. तेथील सुविधांचा आढावा घेऊन मतदारांची गैरसोय होऊ नये, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांद्वारे संकल्पपत्र भरून द्यावे, यातील संदेशामध्ये त्यांच्या मतदान केंद्रांची माहिती द्यावी. लोकशाहीच्या मजबूतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्ट्रोरल पारर्टीसिपेशन’ (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यात यावा आणि शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेऊन त्यांच्या पालकांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करावा – जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव.