घुग्घुस (चंद्रपुर) : आई एकविरा मासेमारी भोई-ढिवर संस्थेतर्फे गुरुवार, १७ ऑक्टोबर रोजी विठ्ठल मंदिरात महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती सोहळा थाटात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, भाजयुमोचे अमोल थेरे, विनय बोढे, कविता पचारे, कविता कामतवार, आशा कामतवार, मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले तसेच प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त केले. संचालन शंकर नागपुरे यांनी केले. यावेळी समाज बांधव मोठया संख्येत उपस्थित होते.