Tuesday, May 20, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

अवैध धंद्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश, 42 नग गोवंशीय जनावरे…

चंद्रपुर : जिल्हात अवैध धंद्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, चंद्रपुर यांनी दिले. त्या अनुषंगाने तारीख 19/08/2024 रोजी रात्री 23:56 वाजता गोपनीय माहीतीच्या आधारे एक ट्रक अवैध गोवंशीय जनावरे कुरतेने वाहनात भरून वाहतुक करीत असल्याचे खबरेवरून सावली पो.स्टे. तील डिव्हीजन गस्त व रात्रगस्त अधि. व अंमलदार यांनी पोस्टे सावली समोरील हायवे रोडवर छापा कारवाईसाठी नाकेबंदी करून नाकेबंदी दरम्याण जप्त ट्रक TS-02,UB – 7671 ची पाहनी केली असता त्यामध्ये 42 नग गोवंशीय जनावरे किंमत. 4,20,000/- रुपये व नमुद वाहन किमंत. 10,00,000/- रुपये असा एकुन 14,20,000/- रुपयेचा माल मिळुन आल्याने महाराष्ट्र पशु संवर्धन अधिनीयम 1976, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनीयम 1960, महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 व मोटार वाहन अधिनीयम 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी भगत, मुल यांचे मार्गदर्शना खाली सपोनि जिवन राजगुरू, पोहवा. संजय शुक्ला/635, पोहवा. मोहन/2622. पोअ.चंद्रशेखर/259, मपोंअ. किरण/6022 पोलीस स्टेशन सावली यांनी केली.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News