घुग्घुस (चंद्रपुर) : आदिवासी समाज बांधवांतर्फे अमराई वार्डात श्री भिवसन देवस्थान व माऊली मंदिर बहुउद्देशीय सेवा मंडळाची स्थापना १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आली.
पुरातन काळापासून स्थापित असणारे अंदाजे २०० ते ३०० वर्षांपूर्वीचे श्री भिवसन देवस्थान व माऊली मंदिर यांचे रीतसर पूजन आदिवासी समाज बांधवांनी करून समाजातील सामाजिक कार्य करण्यास तत्पर असणाऱ्या समाज बांधवांची नेमणूक करून आदिवासी श्री भिवसन देवस्थान व माऊली मंदिर बहुउद्देशीय सेवा मंडळाची स्थापना केली.
सदर मंडळाचे अध्यक्ष गणेश उईके सचिव मारोती जुमनाके, कोषध्यक्ष ज्ञानेश्वर उईके, पुजारी सुनील सोयाम, महिला अध्यक्षा विद्या आत्राम, सचिव कल्पना कोडापे, कोषाध्यक्ष सुनीता आत्राम, पुजारीन फुलनबाई कोयचाळे, सदस्य केशव टेकाम, अमित बोरकर, महेश डोंगे, बंडू गायकवाड, विक्रम गोगला, राजकुमार वर्मा, महेश किन्नाके सदस्या शोभा ठाकरे, उज्ज्वला उईके, पुष्पा मेश्राम, दिनेश मेश्राम, राकेश सलामे, सचिन कोडापे, शरद गेडाम, राहुल चटकी, रवी मडावी, संतोष सलामे, रमेश गेडाम, अजय आत्राम, सुभाष तुमराम, रोहित रामटेके, नरेश येटे, चरनदास टेकाम, सुखदेव जुमनाके, विजय आत्राम, विनोद आत्राम, राजू येटे, महेश कोडापे, सुभाष उईके, हरिदास टेकाम, गणेश कोडापे, अविनाश टेकाम, रामकिसन कोडापे, गजानन टेकाम, धनराज जुमनाके, देविदास सिडाम, पुजा उईके,सुरेखा कोडापे, उज्ज्वला मडावी, अनिता सोयाम, सविता सोयाम, देविका सिडाम, मनीषा उईके, भागरता सिडाम, पुष्पा टेकाम, ललिता येटे,सोनू मडावी, दीपा जुमनाके, मंगला टेकाम, वनिता उईके, मोनिका येटे, सुषमा मडावी, रामेश्वरी जुमनाके, यश उईके, ज्ञापन उईके यांची निवड करण्यात आली आहे.