Saturday, May 17, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

लालगुडा जि.प.शाळेत लीडर माता-गटाचा सन्मान सोहळा

गडचांदूर (चंद्रपुर) : केंद्रांतर्गत असलेल्या लालगुडा जिल्हा परिषद शाळेच्या वतीने शाळा पूर्व तयारी अभियानात कार्यरत माता गटातील महिलांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले. व या वर्षीची निपुण लक्ष गाठण्यासाठी ची सुरुवात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून निपुण शपथ घेऊन करण्यात आली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) ला अनन्य साधारण महत्व दिले असून त्यासाठी निपुण भारत मिशन कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये माता गट अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करत असल्यामुळे त्यांचा कौतुक सोहळा शाळेमध्ये घेण्यात आला.

यावेळी अमावस्या तोडासे, वनिता मरस्कोल्हे, मनीषा मेश्राम, वंदना तोडासे, सीता तोडासे व वैशाली तोडासे यांचा सत्कार करण्यात आला.

या सोहळ्याला ग्रामपंचायत सदस्य मंगेश धूर्वे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष फकरू मरस्कोल्हे, भिकाजी सिडाम, मोतीलाल तोडासे, मुख्याध्यापक प्रकाश बोबडे व शिक्षक गोविंद पेदेवाड उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News