गडचांदुर (चंद्रपुर) : शहराच्या आजु बाजूला चार मोठ मोठे सिमेंट उद्योग आहे. या ठिकाणी मोठया जड वाहनाची वर्दळ मोठ्या प्रमाणात असतात. सदरचे शहर हे सिमेंट उद्योगाचे दृष्टीने मध्यभागात असल्याने सर्वच ट्रान्सपोर्ट मालकाने या शहरात आपले ऑफिस तयार केले. परंतु गाड्या उभ्या करण्यास स्वतः चे पार्किंग करीता जागेची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे सर्वच ट्रान्सपोर्टच्या गाडया नो पार्किंग झोन असलेल्या ठिकाणी उभ्या केल्या जात आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. एवढ्येच नव्हे तर जीवित हानी होण्याची सुध्दा दाट शक्यता नाकारता येत नाही. या पूर्वी पोलीस विभागास सूचना करूनही पोलीस विभागाचे ट्रान्सपोर्ट शी असलेले मधुर समंधा मुळे कुठलीच कार्यवाही न झाल्याने शेवटी आज पोलीस स्टेशनला आज चार दिवसात कार्यवाही करा अन्यथा भाजपाचे वतीने उभ्या गाड्यांचे हवा सोडू व रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा आज भाजपाचे शहर अध्यक्ष अरविंद डोहे, शहर महामंत्री हरीश घोरे, रामसेवक मोरे, शंकर आपूरकर यांनी दिला आहे.
यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते महेश शर्मा, तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, धनराज विरूटकर, भाजप नेते महालिंग कंठाले, अरविंद कोरे, संभा बारमोडे, संदीप ब्रहांपुरे आदींची उपस्थिती होती आता पोलीस विभाग यावर काय भूमिका घेतील या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.