वर्धा : दि.21/08/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन समुद्रपुर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे मौजा शेडगाव चौरस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र.44 येथे सापळा रचुन नाकेबंदी करीत एका पांढ-या रंगाच्या महिद्रा XUV500 कार क्र. MH-49/B-8446 यावर दारूबंदीबाबत प्रो.रेड कार्यवाही केली असता, मोक्कावर आरोपी कार चालक हा मिळुन आला व कारमध्ये त्याचे बाजुला बसुन असलेला त्याचा साथीदार यास पोलीसांचा सापळा लक्षात येताचं, तो अंधाराचा फायदा घेत मोक्कावरून पळुन पसार झाला. पंचासमक्ष कारची पाहणी केली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूचा माल मिळुन आल्याने कार चालकास विचारपुस केली असता, सदर दारूचा माल हा हिंगणघाट येथे राहणारा आकाश उर्फ टिन्या गवळी याचे मालकिचा असुन ते त्याचेकडे दारूविक्री व वाहतुकीचे काम करीत असुन, सदरचा दारूचा माल त्याचे सांगणेवरून त्यांनी वडगाव जि.नागपुर येथील समीर जैयस्वाल यांचे बार मधुन आणल्याचे सांगितल्याने, जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून कार चालकाचे ताब्यातुन एक पांढ-या रंगाच्या महिद्रा एक्स.यु.व्ही. 500 कार क्र. एम.एच. 49 बी. 8446 किं. 15,00,000 रू., 52 खरड्याचे खोक्यात देशी दारूने भरलेल्या कोकण प्रिमियम नं. 1 व टॅंगो पंच कंपनीच्या प्रत्येकी 90 एम.एल.च्या 5,200 सिलबंद शिशा कि 5,20,000 रू., 02 खरड्याचे खोक्यात देशी दारूने भरलेल्या कोकण प्रिमियम नं.1 कंपनीच्या प्रत्येकी 180 एम.एल.च्या 96 सिलबंद शिशा कि 14,400 रू., 04 खरड्याचे खोक्यात विदेशी दारूने भरलेल्या रॉयल स्टॅग कंपनीच्या प्रत्येकी 180 एम.एल.च्या 192 सिलबंद शिशा कि 67,200 रू., 01 खरड्याचे खोक्यात विदेशी दारूने भरलेल्या ओ.सी.ब्लु.कंपनीच्या प्रत्येकी 180 एम.एल.च्या 24 सिलबंद शिशा कि 8,400 रू., एक विवो कंपनीचा ॲन्ड्राईंड मोबाईल कि.10,000 रू., असा जु.किं. 21,20,000 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रक्रणात अमरदिप अरूण जिवने, वय 26 वर्ष, रा.सिध्दार्थ नगर तुकुम चंद्रपुर, ह.मु. संत कबीर वार्ड हिंगणघाट, तेजस मेश्राम रा.इंदिरा नगर चंद्रपुर, ह.मु. संत कबीर वार्ड हिंगणघाट (पसार), आकाश उर्फ टिन्या गवळी रा.संत कबीर वार्ड हिंगणघाट (पसार), समीर जैयस्वाल जि.नागपुर चालक/मालक (पसार) यांचेवर पोलीस स्टेशन समुद्रपुर येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डॉ.सागर कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि.वर्धा चे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशाप्रमाणे पो.उप.नी.उमाकांत राठोड, मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, अभिषेक नाईक, विनोद कापसे, मुकेश ढोके यांनी केली.




