चंद्रपुर : घुग्घुस नगरपरिषद अंतर्गत शहर फेरीवाला समिती मधील 8 निर्वाचित जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीसाठी कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशान्वये घुग्घुस न.प.क्षेत्रातील फेरीवाला निवडणूक पार पडण्याकरिता घुग्घुस न.प.चे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सदर निवडणूक ही अविरोध झाली असून त्यात सर्वसाधारण खुला प्रवर्ग गटातून अमोल माधव क्षीरसागर, विनोद विजय भगत. तसेच सर्वसाधारण खुला प्रवर्ग महिला राखीव गटातून शोभा भुजंगराव उमरे तर अनुसूचीत जाती महिला राखीव गटातून विद्या अतिश डहाळे, इतर मागास प्रवर्ग महिला राखीव गटातून प्रतिभा प्रकाश जोगी, अल्पसंख्याक गटातून शबिब इब्राहिम शेख व विकलांग/दिव्यांग गटातून मुनाफ अली मुजहिद हुसेन हे सदस्य अविरोध निवडून आले. तर अनुसूचीत जमाती करिता कुणाचेही नामनिर्देशन सादर न झाल्याने ती जागा रिक्त आहे.
निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र गादेवार यांच्या हस्ते मुख्याधिकारी यांच्या दालनात प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.




