Thursday, May 22, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

महिला शहर अध्यक्षपदी श्यामा सतीश तोटावार यांची नियुक्ती

वणी (यवतमाळ) : वणी, यवतमाळ येथील महिला शहर अध्यक्षपदी श्यामा सतीश तोटावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस कमिटी यवतमाळच्या महिला जिल्हाध्यक्षा संध्या बोबडे यांनी हे नियुक्ती पत्र दिले. त्यामुळे श्यामा सतीश तोटावार व सतीश तोटावार यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ध्येय आणि नैतिकता सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे हात बळकट करून पक्ष मजबूत करायला हवा.

तोटावार कोण आहे :
श्यामा सतीश तोटावार, वणी, यवतमाळ येथील रहिवासी आहेत. श्यामा सतीश तोटावार, वणी नगरपरिषद माजी नगरसेवक पदावर होत्या. त्यांचे पती सतीश तोटावार हे वणी आणि परिसरातील प्रसिद्ध व्यापारी आणि काँग्रेस कमिटीचे सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्ते होते. यासोबतच वणी हे नगरपरिषदेचे माजी नगरध्यक्ष होते. श्यामा सतीश तोटावार, वणी यांचे पुत्र प्रताप सतीश तोटावार हे विधानसभेचे माजी अध्यक्ष होते.

यावेळी वसंतराव पुरखे (माजी महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री), वामनराव कासावार (माजी आमदार वणी, यवतमाळ), प्रफुल्ल मानकर (काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष, यवतमाळ) आधी उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News