Friday, November 7, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

अमरावती लोकसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बळवंत वानखडे विजयी

अमरावती : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत 07-अमरावती मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांनी हा निकाल जाहीर केला.

उमेदवार वानखडे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी सामान्य निरीक्षक सी.जी. रजनीकांथांन तसेच मतमोजणी निरीक्षक अंजना पंडा उपस्थित होत्या.

उमेदवार निहाय एकूण मतदान याप्रमाणे :
बळवंत बसवंत वानखडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 5 लक्ष 26 हजार 271, नवनीत रवि राणा (भारतीय जनता पार्टी) 5 लक्ष 6 हजार 540, दिनेश गणेशराव बुब (प्रहार जनशक्ती पक्ष) 85 हजार 300, आनंदराज यशवंत आंबेडकर (रिपब्लिकन सेना) 18 हजार 793, संजयकुमार फत्तेसींग गाडगे (बहुजन समाज पार्टी) 4 हजार 513, इंजी. अविनाश हरिषचंद्र धनवटे (पिपल पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक) 730, गणेश नानाजी रामटेके (अखिल भारतीय परीवार पार्टी) 629, गाजी सादोद्दीन जहीर अहमद (राष्ट्रीय ओलमा कौंसिल) 331, दिगांबर वामन भगत (नकी भारतीय एकता पार्टी) 762, नरेंद्र बाबुलाल कठाणे (देश जनहित पार्टी) 422, भाऊराव संपतराव वानखडे (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) 329, ॲड राजू मधुकरराव कलाने (बहुजन भारत पार्टी) 495, सुषमा गजानन अवचार (जय विदर्भ पार्टी) 659, अनिल ठवरे ऊर्फ अनिलकुमार नाग बौद्ध (अपक्ष) 1 हजार 206, अरुण यशवंतराव भगत (अपक्ष) 2 हजार 88, किशोर भीमराव लबडे (अपक्ष) 4 हजार 524, किशोर ज्ञानेश्वर तायडे (अपक्ष) 2 हजार 72, गौतम उर्फ अनंता रामदास इंगळे (अपक्ष) 1 हजार 570, तारा सुरेश वानखडे (अपक्ष) 527, प्रभाकर पांडुरंग भटकर (अपक्ष) 365, प्रमोद रामकृष्ण चौरपगार (अपक्ष) 1 हजार 307, ॲड. पृथ्वीसम्राट मुकिंदराव दीपवंश (अपक्ष) 337, भरत चंपतराव यांगड (अपक्ष) 441, मनोहर कृष्णाजी कुऱ्हाडे (अपक्ष) 871, मानकर ज्ञानेश्वर काशीराव (अपक्ष) 539, रवी गुणवंत वानखडे (अपक्ष) 288, राजू महोदवराव सोनोने (अपक्ष) 232, राजेश तुळशीराम खडे (अपक्ष) 239, वर्षा भगवंत भगत (अपक्ष) 443, श्रीकृष्ण सखाराम क्षीरसागर (अपक्ष) 510, सतीश यशवंतराव गेडाम (अपक्ष) 943, सुमित्रा साहेबराव गायकवाड (अपक्ष) 2 हजार 690, सुरज धनराज नागदवने (अपक्ष) 1 हजार 818, सुरेश पुंडलीक मेश्राम (अपक्ष) 1 हजार 52, सोनाली संजय मेश्राम (अपक्ष) 272, संदीप बाबुलाल मेश्राम (अपक्ष) 257, हिमंत भीमराव ढोले (अपक्ष) 670, तर नोटा 2 हजार 544 असे एकूण 11 लक्ष 73 हजार 579 असे वैध मते ठरले. तसेच अवैध मते 1 हजार 200 तर टेंडर मते 59 होते.

या मतदार संघासाठी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात दि. 26 एप्रिल रोजी मतदान झाले. मतमोजणी लोकशाही भवन, अमरावती येथे आज सकाळी 8 वाजेपासून सुरू झाली. मतमोजणीच्या एकूण 20 फेऱ्यानंतर निकाल जाहीर झाला. मतमोजणीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून सी.जी. रजनीकांथांन हे बडनेरा, अमरावती व तिवसा विधानसभा मतदार क्षेत्राकरिता तसेच अंजना पंडा यांनी अचलपूर, दर्यापूर व मेळघाट विधानसभा मतदार क्षेत्राकरिता काम पाहिले.

मतमोजणीचे अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार टपाली मतपत्रिकांची मतमोजणी 10 टेबलवर व ईव्हीएम वरील मतांची मोजणी विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय प्रत्येकी 18 टेबल वर करण्यात आली.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News