गडचिरोली : गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे डॉ.नामदेवराव किरसान हे विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 6 लाख 17 हजार 792 मते प्राप्त झाली. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी हा निकाल जाहिर केला. डॉ.किरसान यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यावेळी उपस्थित होत्या.

शासकीय कृषी महाविद्यालयात मतमोजणी प्रक्रिया झाली. अन्य उमेदवारांना प्राप्त मते – अशोक नेते, भारतीय जनता पार्टी (476096), योगेश गोन्नाडे, बहुजन समाज पार्टी (19055), धीरज शेडमागे, जनसेवा गोंडवाना पार्टी (2174), बारीकराव मडावी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी (2555), सुहास कुमरे,भीमसेना (2872), हितेश पांडूरंग मडावी, वंचित बहुजन आघाडी (15922), करण सयाम, अपक्ष (2789), विलास कोडापे, अपक्ष(4402), विनोद मडावी, अपक्ष (6126), नोटा (16714). एकूण वैध मते 11 लाख 66 हजार 497.
12 – गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. नामदेवराव किरसान विजयी
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com




