Thursday, May 22, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

रेन वॉटर हार्वेस्टींग केले नसल्यास होणार दंड

बोअरवेल – विहीरधारकांची तपासणी सुरु

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत ज्या मालमत्ताधारकांच्या घरी बोअरवेल अथवा विहीर आहे मात्र त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टींग केलेले नाही अश्या मालमत्ताधारकांची प्रत्यक्ष तपासणी मनपातर्फे सुरु करण्यात आली असुन रेन वॉटर हार्वेस्टींग केले नसल्याचे आढळल्यास २० हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

शहरातील सर्व बोअरवेलधारक, विहीरी असणारी घरे, मोठ्या इमारतींना (अपार्टमेंट) रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अनिवार्य आहे, अश्या मालमत्ताधारकांना प्रसार माध्यमे, दूरध्वनी, एसएमएस, व्हॉइस मॅसेज, नोटीसद्वारे मागील वर्षी सूचित करण्यात आले होते व या वर्षीसुद्धा सूचित करण्यात येत आहे. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यास ठराविक कालावधीची मुदत सुद्धा देण्यात आली होती. मात्र अनेक मालमत्ताधारकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मनपामार्फत सदर कारवाई करण्यात येत आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे हद्दीत नवीन बांधकाम करताना रेन वॉटर हॉर्वेस्टिंग व्यवस्था करणे अनिवार्य असून, त्यासाठी इमारत बांधकाम परवानगी देताना छताच्या आकारानुसार व मजलानिहाय अनामत रक्कम आकारण्यात येते. मात्र, शहरातील ज्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून, रेनवॉटर हॉर्वेस्टिंग व्यवस्था केल्याचे पुरावे सादर केलेले नाही, अशा बांधकामधारकांची अनामत रक्कम यापुर्वी जप्त करण्यात आली आहे.

शहरात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. यावर उपाययोजना म्हणून पावसाळ्यात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा जमिनीत जिरविण्याची आवश्यकता आहे. रेन वॉटर हॉर्वेस्टिंगची अमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी घराच्या छताच्या आकारमानानुसार ५, ७ व १० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान तसेच पुढील ३ वर्षांपर्यंत २ टक्के मालमत्ता करात सुट महानगरपालिकेतर्फे देण्यात येते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News