Sunday, July 13, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

जिल्हा सामान्य रुग्णालयात आता दातांवर उत्कृष्ट उपचार

चंद्रपूर : दंत विभाग समान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने चंद्रपूर जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांना दंत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने फिक्स प्रकारचे दात (सिरेमिक/मेंटल) आणि वेडयावाकडया दात सरळ करणे (फिक्स प्रकारचे ऑथोडॉन्टिक उपचार) या सेवा एप्रिल 2024 पासून सुरु करण्यात आल्या आहेत.

ही दोन्ही उपचार पद्धती अतिशय महागडया असल्यामुळे गोरगरिब व मध्यमवर्गीय रुग्णांना खाजगी रुग्णांलयात जाऊन उपचार करणे फार अडचणीचे होत होते. म्हणून राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अनुदानातून दातांच्या कलरचे फिक्स प्रकारचे दात (सिरेमिक/मेंटल ) गरजू रुग्णांना उपलब्ध होण्यासाठी ही उपचार पद्धती सुरु करण्यात आली आहे. सदर सुविधा सध्या जिल्हयांतील दंत विभाग कार्यान्वित बल्लारपूर, मुल, सिदेंवाही, वरोरा येथे उपलब्ध आहे.

सदर उपचार पद्धतीच्या लाभ घेण्यासाठी रुग्णांना दोन ते तीन वेळा विभागात येणे अपेक्षित राहील. सदर उपचार पद्धतीच्या सुविधेमुळे जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू लोकांच्या चेहरा, सौंदर्यात, बोलण्यात, अन्न चघळण्यात आणि सर्वांगीण आरोग्य सुद्ढ ठेवण्यात नक्कीच मदत होईल. तसेच किशोरवयीन मुलें-मुलींमध्ये वेडयावाकडया दातांची नेहमी तक्रार असते. अशामुळे रुग्णांना दात स्वच्छ करण्यात, बोलण्यात व दिसण्यात फार अडचणी येत असतात. सदर उपचार पद्धती खाजगी रुग्णांलयातमध्ये फार महागडी असल्याने गोरगरिब व गरजू जनतेला लाभ घेणे अडचणीचे असते. म्हणून दंतशास्त्र विभागात नव्याने रुजु झालेल्या डॉ. सुप्रिया वाघमारे (ऑथोडॉन्टिक) यांच्या तज्ज्ञ सेवेचा फायदा रुग्णांना देण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. जिल्हयातील सर्व गरजू लोकांनी या सुविधांचा फायदा घ्यावा, असे आवाहन दंत शल्य चिकित्सक तथा जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. संदिप पिपरे यांनी केले आहे.

चंद्रपूर ज्हियात मौखिक आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी उचलेले हे महत्वपूर्ण पाऊल असून गोरगरिब व गरजू रुग्णांना आधूनिक दंतसेवेची सहज उपलब्धता प्राप्त करता येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी म्हटले आहे. चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात सुरू झालेली आधूनिक दंत उपचार सुविधा जिल्हयातील गोरगरिब व गरजू रुग्णांना नि:शुल्क उपलब्ध होईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे यांनी म्हटले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News