Thursday, May 22, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चारचाकी वाहन नोंदणीसाठी नवी मालिका सुरु

परभणी : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून चारचाकी (एलएमव्ही) वाहनांसाठी लवकरच एमएच-22-बीसी ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. तरी इच्छुक नवीन वाहन खरेदी करणाऱ्या वाहनधारकांनी विहीत नमुन्यात विहित पसंती क्रमांकाच्या शुल्काचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी यांच्या नावे कार्यालयात दि.7, 11 व 12 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 पर्यंत खिडकी क्र. 6 सहा. रोखपाल यांच्याकडे जमा करावेत असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अश्विनी स्वामी यांनी केले आहे.

नविन नोंदणी वितकरांच्या स्तरावर होत असल्यामुळे लिलाव दिनांकात बदल करण्याचा पूर्ण अधिकार या कार्यालयाकडे राहील. एका पसंती क्रमांकासाठी दोन किंवा अधिक अर्ज प्राप्त झाल्यासच लिलाव घेण्यात येईल. तसेच नोंदणी क्रमांक वितरकाच्या स्तरावर मंजूर होत असल्याने काही तांत्रिक अडचण उद्‌भवल्यास लिलाव मागील किंवा पुढील दिनांकास करण्याचे सर्वाधिकार या कार्यालयाकडे राहतील, तरी जास्तीत-जास्त वाहनधारकांनी पसंती क्रमांकासाठी अर्ज करावे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अश्विनी स्वामी यांनी कळविले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News