Saturday, May 24, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

जिल्हा बाल कामगार कृतीदलाची धाड : वणीमध्ये एका बालकाची मुक्तता

व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल

यवतमाळ : जिल्हा बाल कामगारमुक्त व्हावा यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल कामगार कृतीदलाच्यावतीने धाडी टाकण्यात येत आहेत. नुकताच वणी येथे जिल्हा बाल कामगार कृतीदलाने टाकलेल्या धाडीमध्ये विशाल ऑटो सेंटर …, जत्रा रोड, वणी येथे १८ वर्षाखालील एक बालक काम करतांना आढळून आला. त्या बालकास मुक्त करुन बालकल्याण समिती, यवतमाळ येथे सुपूर्द करण्यात आले.

अमरावती येथील नितीन पाटणकर व सरकारी कामगार अधिकारी रा. काळे यांच्या मार्गदर्शनात वणी येथे ३० नोव्हेंबर रोजी यवतमाळ जिल्हा बाल कामगार कृतीदलाने टाकलेल्या या धाडीमध्ये विशाल ऑटो सेंटर …चे वणीमधील रंगनाथ नगर येथील मालक यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता कलम ३७४, अल्पवयीन न्याय कायदा कलम ७५, ७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बाल व किशोरवयीन कामगार अधिनियमाअंतर्गत कलम ३अ मध्ये स्वतंत्र खटला दाखल करण्याची कार्यवाही सुध्दा करण्यात येणार आहे.

या धाडीमध्ये वणीचे दुकाने निरीक्षक विजय गुल्हाने, निरीक्षक रविंद्र जतकर, जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे फाल्गुन पालकर, पोलीस स्टेशन वणीचे पोलीस कॉन्टेबल गेडाम यांनी सहभाग घेतला होता.

जिल्हा बाल कामगार कृतीदलाच्यावतीने धाडीचे वेळोवेळी नियोजन करण्यात येत असून यवतमाळ जिल्ह्यामध्ये बाल कामगार ठेवणाऱ्या आस्थापनाधारक यांच्या विरुध्द कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. या कायद्यांतर्गत कोणत्याही व्यक्तीस, पोलीस अधिकाऱ्यास किंवा निरिक्षकास सक्षम अधिकारिता असणाऱ्या कोणत्याही न्यायालयात अपराध घडल्याची फिर्याद दाखल करता येईल. कोणत्याही आस्थापना मालकांनी बालकांना कामावर ठेवू नये, असे आवाहन जिल्हा बाल कामगार कृतीदल समितीव्दारे करण्यात आले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News