नाभिक समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील! – देवराव भोंगळे यांचे प्रतिपादन
घुग्घुस (चंद्रपूर) : नाभिक समाज संघटनेतर्फे श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन सोमवारी स्थानिक विठ्ठल मंदिर देवस्थान येथे करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा राजुरा विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, किर्तनकार रमाकांत मांढरे, नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष किशोर नागतुरे, उपाध्यक्ष भानुदास अटकारे, सचिव विलास वाटेकर, दशरथ चौधरी, मनोहर अतकारे, पांडुरंग जुनारकर महाराज, गणेश घुमे, मनोज नागतुरे, सुरेश नक्षणे, शंकर नागतुरे, विठ्ठल अतकरे आदिंची उपस्थिती होती.
याप्रसंगी देवराव भोंगळे यांनी संत नगाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर नाभिक समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देवराव भोंगळे आणि विवेक बोढे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना देवराव भोंगळे म्हणाले की, समाजाच्या सर्वागीण उन्नतीसाठी आम्ही कटिबद्ध असून प्रत्येकांनी संत नगाजी महाराजांचा विचार अंगीकारावा. महाराष्ट्र ही संतांची भुमी आहे. संतांच्या विचारांमुळेच आज खरेतर महाराष्ट्रातील आध्यात्मिक व सांस्कृतिक वैभव टिकून आहे. समाजामध्ये सामाजिक व शैक्षणिक बदल घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रीत प्रयत्न केले पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी भजन व महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला, कार्यक्रमाला बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.