Saturday, May 24, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

वरोरा – भद्रावती मतदार संघातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना ‘दिवसा’ थ्री फेस वीजपुरवठा होणार

आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीला यश

चंद्रपूर : जिल्ह्यात कृषिपंपांना दिवसा थ्री फेस वीजपुरवठा होणार आहे. या मागणीसाठी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लावलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात ३ – ११ – २०२३ रोजी सकाळी ११ वाजता उपविभाग वरोरा येथे कार्यालयाला कुलूप लावून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली असून हि मागणी पूर्ण केली आहे. सर्व शेतकरी बांधवांकडून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आभार मानले आहे.

चंद्रपूर जिल्हा हा एक ऊर्जानिर्मिती करणारा जिल्हा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. वरोरा – भद्रावती मतदार कृषी पंपांना अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी बांधव हवालदिल होते. म.रा.वि.वि. कंपनीने थ्री फेस वीजपुरवठ्याचे जिल्ह्यात वेळापत्रक घोषित केले होते. आता रात्रीऐवजी सर्व कृषिपंपांना दररोज दिवसा वीजपुरवठा होणार आहे.

या निर्णयामुळे वरोरा – भद्रावती मतदार संघातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कृषी उत्पादन वाढण्यास मदत होईल. तसेच, हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यांपासून शेतकऱ्यांचे बचाव होईल.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News