घुग्घुस (चंद्रपूर) : 1 ऑक्टोबर 2023 रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवड्यादरम्यान नगर परिषद घुग्घुसच्या वतीने स्वच्छता ही सेवा, एक तारीख, एक घंटा अभियानांतर्गत स्वच्छता श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मेरी मिट्टी मेरा देश अभियानांतर्गत नगर परिषद घुग्घुस येथे पंचप्राण शपथ घेऊन अमृत कलश यात्रा काढण्यात आली.
या मिरवणुकीत शहरवासीयांनी या कलशातील प्रत्येक घरातून माती अर्पण केली.
या उपक्रमात नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मुख्याधिकारी नगर परिषद घुग्घुस यांच्यासह पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन घुग्घुस, जेष्ठ नागरिक सेवा मंडळ व अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.




