Friday, May 1, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

भीम जयंती दिनी दारु दुकान बंद ठेवा : शरद पाईकराव

घुग्घुस शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीची…

घुग्घुस (चंद्रपुर) : वंचित बहुजन आघाडी जिल्हा प्रभारी राजेश बोरकर, जिल्हाध्यक्ष प्रा.सोमाजी गोंडाने, तालुकाध्यक्ष धर्मेंद्र शेंडे यांचा माध्यमातून घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव यांचा नेतृत्वात आज – दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन घुग्घुस ला निवेदन देण्यात आले. या निवेदनाचा माध्यमातून अशी मागणी करण्यात आली की
दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती हे घुग्घुस शहरामध्ये हजारो जनतेचा संख्येने खुप मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते.
घुग्घुस मध्ये खुप मोठ्या प्रमाणात मिरवणूक डिजे वाद्य असते. या मिरवणुकीत कसलीही कुठलीही घटना होण्यास नाकारता येत नाही. म्हणून वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर चा वतीने पोलीस निरीक्षक साहेब यांना विनंती करण्यात आली की की दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी देशी दारू, व बार हे बंद ठेवण्यात यावे.

यावेळेस निवेदन सादर करतांना वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, उपाध्यक्ष दत्ता वाघमारे, जगदीश मारबते, राकेश पारशिवे, अशोक भगत, आशिष परेकर यादी उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News