Monday, August 10, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चंद्रपूरमध्ये 2 ऑक्टो. ते 17 ऑक्टो दरम्यान सैन्य भरती

चंद्रपूर : विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुल येथे 2 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सैन्य भरती रॅली (अग्निवीर भरती) आयोजित करण्यात आली असून याबाबत जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी संबंधित यंत्रणेचा नुकताच आढावा घेतला. यावेळी सैन्य भरती कार्यालय, नागपूरचे डायरेक्टर कर्नल अंशित श्रीवास्तव, सुभेदार राजेंद्र सिंह, हवालदार ओम शिव कुमार, प्रभारी सैनिक कल्याण अधिकारी शुभम दांडेकर, मनपा उपायुक्त संदीप चिद्रावार आदी उपस्थित होते.

सैन्य भरती रॅलीसाठी आवश्यक बाबीवर तसेच बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या युवकासांठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच कर्नल अंशित श्रीवास्तव यांनी सैन्य भरती करीता लागणारे साहित्य, येणाऱ्या अडचणी, जिल्हा प्रशासनाचे अपेक्षित सहकार्य याबाबत सादरीकरण केले.

यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, भरती प्रक्रीयेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी विसापूर स्टेडीयम उपलब्ध करून देणे, महानगरपालिकेशी समन्वय साधून साफसफाई, लाईटस व जनरेटरची व्यवस्था करावी. सैन्य भरती प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी पुरेशी कुमक उपलब्ध करून द्यावी. भरती केंद्रावर कायदा व सुव्यवस्था राखावी. उमेदवारांची मोठी गर्दी झाल्यास गर्दीचे नियोजन व नियंत्रण करावे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने भरती केंद्रावर येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था करावी. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने भरती केंद्र, मैदान, प्रवेशद्वार व इतर आवश्यक ठिकाणी तात्पुरता अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा. सर्व विद्युत वाहिन्या, खांब, मीटर व जोडण्या सुरक्षित असल्याची तपासणी करावी.

सैन्य भरती दरम्यान महानगरपालिका प्रशासनाने रस्ते व संपूर्ण परिसराची स्वच्छता व साफ-सफाई जबाबदारी पार पाडावी. शहरातून मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या युवकांसाठी स्टेडिअममध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी चार रुग्णवाहिका प्रथमोपचार साहित्य व आवश्यक जीवनरक्षक उपकरणांसह उपलब्ध करून द्यावी. उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी तसेच आवश्यक सुचना स्थानिक भाषेत प्रसारीत करण्यासाठी शिक्षण विभागाने 10 शिक्षकांची नियुक्ती करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News