Thursday, April 23, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

महिला व बाल अत्याचाराविरोधात सखी वन स्टॉप सेंटरचा जनजागृती उपक्रम

(प्रणयकुमार बंडी)

घुग्घुस, चंद्रपूर | 31 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत कार्यरत मान्यताप्राप्त सखी वन स्टॉप सेंटर, चंद्रपूर यांच्या वतीने महिलांवरील तसेच बालकांवरील अत्याचाराविरोधात जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सखी संघटक, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचे कार्यालय तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चंद्रपूर यांच्या सहकार्याने शहरातील विविध संवेदनशील (विरोधी) क्षेत्रांत जनजागृतीपर पोस्टर व बॅनर लावण्यात आले.

या वेळी सखी वन स्टॉप सेंटर, चंद्रपूरच्या प्रतिनिधी राणी खडसे यांनी महिलांवर व विशेषतः बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. समाजात अजूनही अनेक प्रकरणे भीती, लज्जा किंवा अज्ञानामुळे समोर येत नसल्याचे नमूद करत, पीडित महिलांनी व बालकांनी निर्भयपणे पुढे येऊन शासनाच्या सखी वन स्टॉप सेंटरसारख्या मदत केंद्रांचा आधार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास जिल्हा महिला सक्षमीकरण विभागाच्या जनरल स्पेशालिस्ट सुनीता पिंपळ शेट्टीवार यांची उपस्थिती लाभली. त्यांनी सखी केंद्रामार्फत मिळणाऱ्या समुपदेशन, वैद्यकीय, कायदेशीर व पोलीस सहाय्याबाबत माहिती देत, एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध असल्याने पीडितांना मोठा आधार मिळतो, असे स्पष्ट केले.

घुग्घुस पोलीस स्टेशन परिसरात पोस्टर लावतानाच्या वेळी API योगेश पाटील हेही उपस्थित होते. त्यांनी महिलांवरील व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर असल्याचे सांगून, अशा जनजागृती मोहिमा समाजातील मानसिकता बदलण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

या उपक्रमामुळे महिलांमध्ये व पालकांमध्ये हक्कांची जाणीव निर्माण होऊन, अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचे धैर्य मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News