Wednesday, April 29, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

वाहनांवर सायकल कॅरिअर बसविलेल्या वाहनधारकांना दिलासा; यापुढे होणार नाही कारवाई – परिवहन आयुक्त भीमनवार यांची माहिती

मुंबई : वाहनांच्या मागील बाजूस सायकल कॅरिअर लावून सायकल वाहून नेणाऱ्या वाहनधारकांना दिलासा देणारी माहिती परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. वाहनांच्या पाठीमागे सायकल कॅरिअर अशा प्रकारे बसविण्यात आले असल्यास की ज्यामुळे इतर वाहनांना कोणताही अडथळा निर्माण होत नाही, तर अशा वाहनांवर यापुढे कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पर्यावरणपूरक आणि आरोग्यासाठी उपयुक्त असलेली सायकल, अनेक नागरिक आपल्या वाहनांच्या साहाय्याने विविध ठिकाणी नेत असतात. अनेक देशांप्रमाणे भारतातही सायकलचा वापर वाढत असून, अनेकजण वाहनांच्या मागे सायकल कॅरिअर बसवून सायकल वाहून नेतात.

मोटार वाहन कायद्यानुसार सायकल कॅरिअर बसवण्यास कुठलाही बंदी नाही. तरीही काही प्रकरणांमध्ये परिवहन व पोलिस विभागाच्या अंमलबजावणी पथकांकडून अशा वाहनांवर कारवाई केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, जर सायकल कॅरिअरमुळे वाहतुकीला कोणताही अडथळा होत नसेल, तर अशा वाहनधारकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही.

ही सूचना सार्वजनिक करून वाहनधारकांची गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सायकलच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी ही सकारात्मक पावले उचलली गेली आहेत.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News