Sunday, April 19, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची ६६ वी तुकडी रवाना

घुग्घुस (चंद्रपूर) : घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र आणि मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती, महाराष्ट्र यांच्या वतीने रविवारी, १५ जून रोजी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची ६६ वी तुकडी रवाना करण्यात आली. ही तुकडी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वात आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठविण्यात आली.

या उपक्रमाअंतर्गत सर्व रुग्णांची शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक सर्व आरोग्यसेवा मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती कडून पुरविण्यात येणार आहे.

या प्रसंगी बोलताना जिल्हा महामंत्री विवेक बोढे म्हणाले, “घुग्घुस परिसरात आरोग्यसेवेचे कार्य अखंडपणे सुरू आहे. आजपर्यंत या सेवेद्वारे परिसरातील १० हजारांहून अधिक रुग्णांना मोफत वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. आज रवाना होणारी ही ६६ वी तुकडी म्हणजे जनसेवेच्या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

कार्यक्रमावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चिन्नाजी नलभोगा, भाजयुमोचे गणेश कुटेमाटे, शंकर सिद्दम, प्रमोद भोस्कर, धनराज पारखी, डॉ. सुनील राम, हेमंत कुमार, अजय लेंडे, हनुमान खडसे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या उपक्रमामुळे घुग्घुस परिसरातील अनेकांना दृष्टीसंपादनाची संधी मिळत असून, समाजहितासाठीचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News