Sunday, April 19, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

नकोडा गावात ट्रक वाहतुकीला आळा घालण्यासाठी लोखंडी अडथळा बसवला; गावकऱ्यांचा महत्वपूर्ण निर्णय

नकोडा, [चंद्रपुर] – नकोडा गावातून होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील ट्रक वाहतुकीमुळे अपघातांची सतत भीती निर्माण होत होती. या गंभीर समस्येची दखल घेत गावकऱ्यांनी पुढाकार घेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, गावाच्या सुरक्षेसाठी प्रवेशद्वारीवर “ब्रॅकेट” (लोखंडी अडथळा) बसवण्यात आला आहे.

या उपक्रमात ब्रिजभूषण पाझारे यांच्या नेतृत्वाखाली गावातील नागरिक, पोलीस प्रशासन आणि ACC मॅनेजमेंट यांचे संयुक्त सहकार्य लाभले. सर्व घटकांनी एकत्र येत गावाच्या सुरक्षिततेसाठी उचललेले हे पाऊल अत्यंत स्तुत्य आहे.

गावात ट्रक वाहतुकीमुळे संभाव्य अपघातांची शक्यता कायम होती. या निर्णयामुळे भविष्यातील दुर्घटनांना आळा बसेल आणि गावातील नागरिकांचे जीवित अधिक सुरक्षित राहील, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.

गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे नकोडा गावाने एक अनुकरणीय उदाहरण उभे केले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या सामूहिक निर्णयामुळे ग्रामीण भागात वाढणाऱ्या वाहतुकीच्या समस्यांवर निश्चितच प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News