Sunday, April 19, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

घुग्घुस (चंद्रपूर) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या हस्ते पर्यावरणपूरक आणि औषधी गुणधर्म असलेल्या कडुलिंबाच्या रोपाचे रोपण करण्यात आले.

यावेळी राजुरेड्डी यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “घुग्घूस शहरातील वाढते प्रदूषण चिंताजनक बनले आहे. प्रदूषण या राक्षसाने संपूर्ण पर्यावरणाला विळखा घातला असून, त्यातून निसर्गाची सुटका करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे येणे आवश्यक आहे.”

“दर व्यक्तीने किमान एका वृक्षाचे रोपण आणि त्याचे संगोपन केले, तर पर्यावरणाचा समतोल राखता येईल,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, बालकिशन कुळसंगे, दीपक पेंदोर, तालुका सचिव विशाल मादर, NSUI अध्यक्ष आकाश चिलका, मोसीम शेख, रोहित डाकूर, सुनील पाटील, अरविंद चहांदे, दीपक कांबळे, देव भंडारी, नुरूल सिद्दीकी, विजय माटला, कुमार रुद्रारप, कपिल गोगला, शहंशाह शेख, सुमेश रंगारी, सुरज मिश्रा, रंजीत राखुंडे, संजय कोवे, अंकुश सपाटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन पर्यावरण जागरुकतेच्या उद्देशाने करण्यात आले असून, पुढील काळातही असे उपक्रम राबवले जातील, अशी माहिती आयोजकांनी दिली.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News