भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सालेबर्डी शेतशिवारात हातभट्टी दारू तयार करण्याचा अड्डा उघडकीस आला आहे. आरोपी हा घटनास्थळी हातभट्टी दारू तयार करताना आढळून आला.
पोलीसांनी छापा टाकून ११ प्लास्टिक ड्रममधील अंदाजे ५५० किलो महफूल दारूसह दारू तयार करण्याचे साहित्य असा एकूण ₹१,१७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कारधा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर दारू उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीविरोधात संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.




