Wednesday, April 29, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चंद्रपूरमध्ये सुसज्ज वन नियंत्रण कक्ष व सायबर सेलचे उद्घाटन; वन्यजीव संरक्षणासाठी तात्काळ प्रतिसाद देण्यास मदत

चंद्रपूर – चंद्रपूर वनवृत्तांतर्गत वने आणि वन्यजीव संरक्षण अधिक प्रभावीपणे होण्यासाठी तसेच मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांवर तात्काळ कारवाई करता यावी यासाठी येथे सुसज्ज वन नियंत्रण कक्ष व सायबर सेलची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन आज राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार देवराव भोंगळे, अपर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता विश्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास राव, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक प्रभुनाथ शुक्ला, उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक, आनंद रेड्डी, श्वेता बोड्डू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

वनमंत्री नाईक म्हणाले की, पोलिस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या या वन नियंत्रण कक्षामार्फत वाघ, बिबट्या यांच्याशी संबंधित घटना, वनआगी, वन्यजीवांच्या हालचाली यांची माहिती एकत्रित केली जाईल आणि त्यानुसार यंत्रणांना सक्रिय करण्यात येईल. चंद्रपूरचा हा उपक्रम यशस्वी ठरल्यास राज्यातील इतर संवेदनशील भागांमध्येही अशा कक्षांची स्थापना केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.

वन नियंत्रण कक्षाची वैशिष्ट्ये :

२४x७ कार्यरत नियंत्रण कक्ष : प्रशिक्षित कर्मचारी सदैव उपस्थित असून तात्काळ प्रतिसादासाठी सज्ज.

टोल फ्री क्रमांक : १८००३०३३ – नागरिकांना तक्रारी नोंदविणे व माहिती मिळविणे सुलभ.

Forest Control App : वनरक्षक ते वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यासाठी विशेष ॲप तयार. प्रशिक्षणही प्रदान.

रिअल टाईम लोकेशन ट्रॅकिंग : वन कर्मचारी व शासकीय वाहनांचे स्थान ट्रॅक करून जवळच्या कर्मचार्‍यांना तात्काळ घटनास्थळी पाठवता येते.

कन्सोल स्क्रीनसह वाहनांमध्ये ॲप लॉगिन : वरिष्ठ अधिकारी दौऱ्यावर असतानाही माहिती सहज उपलब्ध.

या नव्या यंत्रणेच्या मदतीने वन्यजीव संरक्षणाच्या दिशेने अधिक वेगाने व प्रभावीपणे पावले उचलता येणार असून, वन विभागाचे कार्य अधिक समन्वयाने आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राबविण्यात येणार आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News