Wednesday, April 29, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

नगर परिषदेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन : कापडी पिशव्या वाटप व प्लास्टिक विरोधात जनजागृती

नगर परिषद कार्यालयात “स्वच्छ सर्वेक्षण २०२५” व “माझी वसुंधरा ६.०” अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिनांक ०५ जून २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांचे मार्गदर्शन मुख्याधिकारी नीलेश रंजनकर यांनी केले.

या उपक्रमांमध्ये तिसऱ्या टप्प्यात विशेषतः बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक कापडी पिशव्या शहरातील नागरिकांना, नामवंत व्यक्तींना व पोलीस अधिकाऱ्यांना वाटण्यात आल्या. यावेळी उपस्थित नागरिकांना एकल वापराच्या प्लास्टिक पिशव्या टाळण्याचे आणि पर्यावरणास अनुकूल अशा कापडी पिशव्यांचा स्वीकार करण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमात नगर परिषदचे मुख्याधिकारी, विविध संवर्गातील अधिकारी, कर्मचारी व सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान “झाडे लावा, झाडे जगवा”, “प्लास्टिक प्रदूषणाचा अंत – जागतिक स्तरावर एक पाऊल”, आणि “कापडी पिशवीचा स्वीकार करा, प्लास्टिकचा बहिष्कार करा!” असे पर्यावरणविषयक संदेश देत जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, प्लास्टिकमुक्त शहराच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकण्यात आले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News