Thursday, April 23, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

भाजप स्थापना दिवस आ. जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात उत्साहात साजरा

घुग्घुस (चंद्रपुर) : येथील आ. किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात आणि उत्सवाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. रविवार, दि. ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन भाजप नेते संजय तिवारी यांच्या नेतृत्वात, माजी अध्यक्ष डॉ. श्याम बोबडे यांच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मा. श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. दीनदयाळ उपाध्याय आणि भारतमाता यांच्या प्रतिमांना दीपप्रज्वलन करून व पुष्पहार अर्पण करत अभिवादनाने झाली.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना माजी उपसरपंच संजय तिवारी म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष हा एक राष्ट्रवादी विचारधारेचा पक्ष असून, भारताला एक सक्षम, समृद्ध व जागतिक मंचावर प्रभावी राष्ट्र बनविण्याच्या उद्देशाने ६ एप्रिल १९८० रोजी कोटला मैदान, नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आला. पहिले अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांनी पक्षाची धुरा स्वीकारत भारतीय राजकारणाला नवे परिमाण दिले.”

कार्यक्रमात राम जन्मोत्सवाचे औचित्य साधून उपस्थित कार्यकर्त्यांना राम नवमीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. या कार्यक्रमाला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सामूहिक घोषणांनी आणि एकात्मतेचा संदेश देत करण्यात आली.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News