घुग्घुस (चंद्रपुर): येथील मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे नेतृत्व भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी केले.
भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य नोंदणी पूर्ण झाली असून, वाढता जनाधार आणि लोकांचा विश्वास याबद्दल महाराष्ट्र भाजपातर्फे जनतेचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. या प्रसंगी भाजपा नेते नामदेव डाहुले आणि विनोद चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात बोलताना जिल्हा महामंत्री विवेक बोढे म्हणाले, “भाजपा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर एक कुटुंब आहे. घुग्घुस येथील मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राने सदस्य नोंदणीत आघाडी घेतली असून, आतापर्यंत ६ हजारांहून अधिक सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे.”
कार्यक्रमात दुपारी २ वाजता मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे ऑनलाईन मार्गदर्शन दाखवण्यात आले. महाराष्ट्रात एकाच वेळी १२ लाख कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे उद्दिष्ट या उपक्रमामागे होते.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलांची मोठी उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांमध्ये नामदेव डाहुले, विनोद चौधरी, धनराज पारखी, साजन गोहणे, सुरेंद्र भोंगळे, तसेच सौ. कोमल ठाकरे, वैशाली ढवस, सुनीता पाटील, अर्चना लेंडे, ममता मोरे आदींचा समावेश होता.
या कार्यक्रमातून घुग्घुस येथील भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह आणि संघटनशक्ती पुन्हा एकदा दिसून आली. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरले.




