Friday, May 1, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

वाढत्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेसचे घुग्घूसमध्ये आंदोलन

घुग्घूस (चंद्रपूर) : देशभरात वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांविरोधात काँग्रेस पक्षाने आज घुग्घूसमध्ये तीव्र निषेध आंदोलन केले. काँग्रेसचे शहराध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या आंदोलनात केंद्र व राज्य सरकारच्या अपयशाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

देशात मणिपूर घटनेच्या जखमा ताज्या असतानाच हरियाणातील महिला काँग्रेस नेत्या हिमानी नरवाड यांची क्रूर हत्या आणि पुण्यात शिवशाही बसमध्ये घडलेला संतापजनक बलात्काराचा प्रकार समोर आला आहे. विशेषतः, एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीचीही सुरक्षा भंगली जात असेल, तर सामान्य महिलांचे काय, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

या घटनांच्या निषेधार्थ काँग्रेसने रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध नोंदवला. या आंदोलनात काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, संध्या मंडल, तालुका सचिव विशाल मादर, ज्येष्ठ नेते शेखर तंगडपल्ली, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, शेख शमिउद्दीन, सुनील पाटील, निखिल पुनगंटी, अरविंद चहांदे, अभिषेक सपडी, विजय माटला, रोहित डाकुर, मोसीम शेख, बालकिशन कुळसंगे, दीपक कांबळे, अंकुश सपाटे, कपिल गोगला, रंजीत राखुंडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावर सरकारला जबाबदार धरत काँग्रेसने हा प्रश्न संसदेतही लावून धरावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News