Saturday, May 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

नागपूरमध्ये लवकरच आदिवासी संग्रहालय आणि स्पर्धा परीक्षा ग्रंथालय

नागपूर: राज्यात आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात असून, नागपुरात लवकरच आदिवासी संग्रहालय आणि स्पर्धा परीक्षा ग्रंथालय उभारले जाणार आहे. तसेच, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील सर्व आदिवासी विकास योजना एकत्रित राबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री, आमदार अशोक उईके यांनी दिली.

प्रेस क्लब येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “आदिवासी समाजाच्या हक्काच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी विशेष मोहीम आणि नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल.”

मंत्री उईके यांनी सांगितले की, आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी संग्रहालय उभारले जात आहे, तर तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी चांगले अध्ययन साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी विशेष ग्रंथालयाची निर्मिती केली जाणार आहे.

राज्यातील सर्व आदिवासी विकास योजना समन्वयाने राबवून त्या अधिक प्रभावी करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी लवकरच एक विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News