Thursday, July 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे पाणपोईचे उद्घाटन व लाडू वाटप

घुग्घुस (चंद्रपुर) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी शहर काँग्रेसच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन व लाडू वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सध्या उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे शाळकरी विद्यार्थी, प्रवासी, शेतमजूर व कामगारांना थंड पाण्यासाठी महागडे बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत आहे. या समस्येची दखल घेत नागरिकांना मोफत थंड पाणी उपलब्ध करून देण्यासाठी काँग्रेसने पाणपोई सुरू केली. एका चिमुकल्या मुलीच्या हस्ते लाल रिबन कापून पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिक, युवा बजरंग क्रीडा मंडळाचे पदाधिकारी तसेच काँग्रेस पक्षाचे अनेक मान्यवर नेते उपस्थित होते. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, राष्ट्रवादी शहराध्यक्ष दिलीप पिट्टलवार, अनिरुद्ध आवळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, महिला कार्याध्यक्ष दीप्ती सोनटक्के, सुजाता सोनटक्के, मंगला बुरांडे, निलिमा वाघमारे, मोसीम शेख, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, तालुका सचिव विशाल मादर, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, विजय माटला, एन. एस. यु. आय अध्यक्ष आकाश चिलका, बालकिशन कुळसंगे, देव भंडारी, सामाजिक कार्यकर्ते पंकज धोटे, अभिष गोहोकार, दीपक पेंदोर, सुनील पाटील, रोहित डाकूर, नुरूल सिद्दीकी, दीपक कांबळे, गजानन नागोसे, कपिल गोगला, संजय कोवे, रंजीत राखुंडे, अंकुश सपाटे, निखिल पुनगंटी, आयुष आवळे, साहिल आवळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या विचारांवर प्रकाश टाकत त्यांच्या शौर्याची महती सांगितली. तसेच, उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा देण्यासाठी अशा समाजोपयोगी उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. या पाणपोईच्या माध्यमातून उन्हाळ्यात नागरिकांना मोफत शुद्ध व थंड पाणी उपलब्ध करून देण्याचा काँग्रेसचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शहर काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व त्यांच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात आले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News