Saturday, May 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

“उत्सव नारिशक्तीचा” कार्यक्रमाला घुग्घूस वासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सैराट फेम रिंकू राजगुरू ठरली विशेष आकर्षण, ५० नृत्य गटांचा सहभाग

घुग्घूस (चंद्रपुर ) : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने “उत्सव नारिशक्तीचा” या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी स्नेहप्रभा मंगल कार्यालयात करण्यात आले. या कार्यक्रमाला घुग्घूस वासीयांनी भरघोस प्रतिसाद दिला. विशेष आकर्षण ठरली सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) हिची उपस्थिती.

कार्यक्रमात एकल नृत्य, युगल नृत्य आणि समूह नृत्य अशा विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल ५० हून अधिक नृत्य गटांनी यात सहभाग घेतला. नृत्य स्पर्धांमधील सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी रिंकू राजगुरू हिच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण रंगतदार झाले.

महिला सबलीकरणावर भर – आमदार किशोर जोरगेवार
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले,
“महिला सबलीकरण हा समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. महिलांना संधी मिळाल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतात. भविष्यातही महिलांसाठी असे उपक्रम राबवले जातील.”

रिंकू राजगुरू हिच्या प्रेरणादायी उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. आपल्या मनोगतात तिने सांगितले की,
“घुग्घूस वासीयांचा उत्साह आणि प्रेम पाहून आनंद झाला. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महिलांना प्रोत्साहन मिळते, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.”

स्पर्धेतील विजेते:
एकल नृत्य: प्रीती झाडे
युगल नृत्य: शोभा आणि विभा
समूह नृत्य: शेणगाव येथील “नचले” गृप – प्रथम पारितोषिक

प्रमुख उपस्थित मान्यवर:
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह कल्याणी किशोर जोरगेवार और अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली.

कार्यक्रम पाहण्यासाठी घुग्घूस वासीयांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. महिलांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांचे कलागुण सादर होण्यासाठी हा कार्यक्रम यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News