315 पैकी 292 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
घुग्घुस, चंद्रपुर : घुग्घुसपासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावरील मुंगोली ओपन कास्ट कोलफिल्ड कर्मचारी सहकारी पतसंस्थेची सन 2026 ते 2031 या कालावधीसाठीची संचालक मंडळ निवडणूक रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात आणि शांततेत पार पडली. या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत लोकशाही प्रक्रियेवर विश्वास व्यक्त केला.
संस्थेच्या 31 ऑक्टोबर 2023 रोजीच्या सभासद “आय” नमुन्यानुसार एकूण 315 मतदार नोंदणीकृत होते. त्यापैकी 292 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संस्थेच्या 11 संचालक पदांसाठी 23 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.
विजयी उमेदवारांची यादी
सर्वसाधारण गटातून गिरीधर नागोबा रोडे, नितीन शामराव पानघाटे, प्रमोद रामदास पानघाटे, विकास दादाजी पानघाटे, राजकुमार गजानन सावे, गणेश गुलाव पिंपळकर.
इतर मागासवर्गीय प्रवर्गातून बंडू नामदेव भोंगळे, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून महेंद्र जानबा भगत, भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून चंपत यादव खांडारकर, महिला प्रतिनिधी मतदारसंघातून ललिता बालाजी उपासे, शारदा दिलीप ठाकरे, शाळेत मतदान, सायंकाळी निकाल जाहीर. ही निवडणूक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साखरा येथे सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पार पडली. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी 6 वाजता उमेदवारांच्या उपस्थितीत मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला.
प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी आयोजन
निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश कुमार मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राध्यक्ष गणेश डाखरे तसेच मतदान अधिकारी मोहन खाडे, अंकुश मते, गणेश गाउत्रे, चेतन वांढरे, विकास चौधरी आणि प्रवीण वाढकर यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पाडली.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
कायदो व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अविनाश बनकर व महिला पोलीस कर्मचारी प्रिया सुरेश निब्रड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी संस्थेचे प्रशासक एस.के. पिसाळकर, व्यवस्थापक सुरेश खडसे आणि लिपिक नंदकिशोर खापणे उपस्थित होते. निवडणूक शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडल्याने सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.




