चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील नकोडा परिसरात मोठ्या संख्येने तेलगू भाषिक बांधव वास्तव्यास असून, येथे आज पारंपरिक समक्का–सारक्का उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या पावन उत्सवाला उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधण्यात आला.
नकोडा परिसरातील तेलगू भाषिक बांधव सामाजिक बांधिलकी जपणारे असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम सकारात्मक भूमिका राहिली आहे. या परिसराचा समग्र विकास व्हावा, या उद्देशाने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
आज ज्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ते तेलगू भाषिक बांधवांचे महत्त्वाचे केंद्रस्थान आहे. त्यामुळे या केंद्रस्थानासह नकोडा परिसरातील विकासकामांसाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
नकोडा परिसराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय असून, पुढील काळातही लोकहिताची व विकासाभिमुख कामे सातत्याने राबविली जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




