Friday, June 12, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ : शेवटच्या दिवशी ५६५ नामनिर्देशन दाखल

चंद्रपूर | चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ साठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या अंतिम दिवशी, मंगळवार दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या पाच कार्यालयांमध्ये एकूण ५६५ नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली आहेत.

प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी बुधवार दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार असून, छाननी पूर्ण होताच वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी तत्काळ प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक शुक्रवार दि. ०२ जानेवारी २०२६ असून, ही प्रक्रिया सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत पार पडणार आहे. त्यानंतर शनिवार दि. ०३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. त्याच दिवशी अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.

अर्ज दाखल केंद्रनिहाय नामनिर्देशनांची संख्या पुढीलप्रमाणे आहे :

  1. निवडणूक निर्णय अधिकारी क्र. १ (प्रभाग क्र. १, २ व ५) – ९९ अर्ज
  2. निवडणूक निर्णय अधिकारी क्र. २ (प्रभाग क्र. ३, ४ व ६) – ९२ अर्ज
  3. निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ३ (प्रभाग क्र. ७, ८ व ९) – ८२ अर्ज
  4. निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ४ (प्रभाग क्र. १०, ११, १२ व १५) – १५८ अर्ज
  5. निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ५ (प्रभाग क्र. १३, १४, १६ व १७) – १३४ अर्ज

महानगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनाच्या टप्प्यावरच मोठ्या संख्येने उमेदवार मैदानात उतरल्याने आगामी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News