Saturday, July 11, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

गणेशोत्सवात प्रथमच राज्यस्तरीय रील स्पर्धा – विजेत्यांसाठी लाख रुपयांची पारितोषिके

मुंबई – यंदाच्या गणेशोत्सवाला सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून देश-विदेशात नवे आयाम मिळणार आहेत. प्रथमच महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने ‘रील स्पर्धेचे आयोजन’ करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी आणि रील अपलोड करता येणार आहेत. राज्यस्तरावर घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.

प्रथम क्रमांक विजेत्यास १ लाख रुपये

द्वितीय क्रमांक विजेत्यास ७५ हजार रुपये

तृतीय क्रमांक विजेत्यास ५० हजार रुपये

या उपक्रमातून गणेशोत्सवाचा सांस्कृतिक वारसा, भक्तिभाव आणि सर्जनशीलता नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News